युवा प्रशिक्षण योजनेतील नोकरीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण 

लाडका भाऊ, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लागलेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी ११ महिन्यांचीच संधी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

युवा प्रशिक्षण योजनेतील नोकरीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लाडका भाऊ, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेत (Youth Work Training Scheme) लागलेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी ११ महिन्यांचीच (11 months of employment for apprentices) संधी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केवळ ११ महिन्यांसाठी रोजगाराची संधी मिळेल. त्यांना सरकारी किंवा खासगी सेवेत कायम ठेवले जाणार नाही, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली. 

नियोजन विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली. बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे, या उमेदवारांना नोकरीत कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी सरकारची बाजू मांडली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच असून, उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले की, ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच आहे. त्यामुळे उमेदवारांनी या योजनेद्वारे शासकीय सेवेत कायम नियुक्ती होईल, असा गैरसमज करून घेऊ नये.

या योजनेचा मुख्य उद्देश पदवीधर किंवा पदवीधर होण्याच्या मार्गावर असलेल्या युवकांना कामाचा अनुभव मिळवून देणे हा आहे. याअंतर्गत सुरुवातीला फक्त खासगी क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची तरतूद होती, मात्र नंतर त्यात सरकारी सेवेलाही समाविष्ट करण्यात आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.