चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपीक व शिपाई पदांची परीक्षा पुढे ढकलली

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहीता लागू असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपीक व शिपाई पदांची परीक्षा पुढे ढकलली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Chandrapur District Central Cooperative Bank) रिक्त ३५८ पदाची पदभरती ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात आले. परीक्षेचा पुढील टप्पा म्हणून १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान लेखी परीक्षाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहीता लागू असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात (Exam date postponed) येत असल्याचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेप्रमाणे, दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२४ ला आयोजित केलेली परीक्षा आदर्श आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशिक्षार्थी उमेदवारांनी परीक्षा नियोजनाबाबत नवीन परीक्षा तारखा बँकेच्या www.cdccbank.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

चंद्रपूर जिल्हा बँकेतील एकूण ३५८ रिक्त जागांपैकी लिपिक पदाच्या २६१ तर शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी ही भरती राबवण्यात येत आहे.यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांकडून लिपिक पदासाठी अर्ज मागवले आहेत. तर शिपाई पदांसाठी १० वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरवण्यात आले आहेत.