CBSE 10 वी आणि 12 वी परीक्षांचे हॉल तिकीट उपलब्ध 

सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेत जाऊन त्यांचे हॉल तिकट प्राप्त करून घेऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वत: हॉल तिकट डाउनलोड करू शकत नाहीत

CBSE 10 वी आणि 12 वी परीक्षांचे हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वी  बोर्ड परीक्षांसाठी (10th and 12th Exams) हॉल तिकीट (Hall Ticket)उपलब्ध करून दिले आहेत. सर्व शाळा लॉगिन आयडी टाकून त्यांच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करून वितरित करू शकतात. हॉल तिकट सीबीएसईच्या www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व शाळांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आणि युजर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यांच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करावे . यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या हॉल तिकीटावर शिक्का मारून स्वाक्षरी करून ती विद्यार्थ्यांमध्ये वाटली पाहिजेत. सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेत जाऊन त्यांचे हॉल तिकीट प्राप्त करून घेऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी स्वत: हॉल तिकीट डाउनलोड करू शकत नाहीत, असे बर्डाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती झाल्या प्रसिद्ध

विद्यार्थ्याचे  नाव, रोल नंबर, परीक्षेचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, परीक्षा केंद्राचे नाव आणि इतर माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटामध्ये  नोंदवले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक तपासावी आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यांनी तात्काळ त्यांच्या शाळेशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.  

CBSE बोर्ड 15 फेब्रुवारी 2024 पासून देशभरात इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा सुरू करणार आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षा 13 मार्च 2024 पर्यंत घेण्यात येतील, तर 12 वीचा अंतिम पेपर 2 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येईल.