प्रा.दयानंद सुर्यवंशी यांना पीएचडी प्रदान
पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (EHR) अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असलेल्या संधी आणि आव्हानांचा अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील जी. एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय स्कील टेक विद्यापीठात (G. H. At Raisoni International Skill Tech University)परीक्षा नियंत्रक पदावर कार्यरत असलेले प्रा. दयानंद वासुदेव सुर्यवंशी (Dayanand Vasudev Suryavanshi)यांना राजस्थान येथील जे. जे. टी. विद्यापीठाकडून कॉम्प्युटर सायन्स शाखेची पीएच.डी. (PHD)प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी "पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (EHR) अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असलेल्या संधी आणि आव्हानांचा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉ. एस.के. यादव आणि डॉ. अभिजित कैवाडे यांनी मार्गदर्शन केले.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी , कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि जी.एच. रायसोनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम.यू. खरात यांनी डॉ. सुर्यवंशी आणि स्किल टेक विद्यापीठातील प्राध्यापक आणि सहकारी यांनी सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले आहे.