NEET UG परीक्षेतील गैरप्रकार ; 40 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका आणि बनावट हॉल तिकिट
भुवनेश्वर स्पेशल क्राइम युनिटने ओडिशातील दोघांसह चार जणांना अटक केली, असे पोलीस आयुक्त एसडी सिंह यांनी सांगितले. ही टोळी वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुकांकडून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेत असे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागच्या वर्षी पेपर लीक आणि इतर गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या NEET UG परीक्षेत (NEET UG Exam) यंदाही अनेक गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. काल 4 मे रोजी चोख बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. पण परीक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार उघड झाले. (Many irregularities were revealed during the examination) कुठे विद्यार्थ्यांना मेडिकल सीट घेऊन देण्याचे आमिष दाखवले जात होते, तर कुठे NEET UG च्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकल्या जात होत्या. तर काही ठिकाणी बनावट प्रवेश पत्र घेऊन काही युवक परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला पोहोचले होते.
देशतील विविध परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोपाखाली आंतरराज्यीय टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
भुवनेश्वर स्पेशल क्राइम युनिटने ओडिशातील दोघांसह चार जणांना अटक केली, असे पोलिस आयुक्त एसडी सिंह यांनी सांगितले. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ही टोळी वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुकांकडून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेत असे.
सिंग म्हणाले की, 'टोळीचा प्लॅन बनावट उमेदवारांना परीक्षेत बसवणे हा होता. टोळीने २०-३० लाख रुपयांसाठी प्रॉक्सी उमेदवार तयार केले होते. ही टोळी प्रत्येक उमेदवाराकडून २० ते ३० लाख रुपये आकारत असल्याचे त्यात म्हटले आहे. तर दुसरिकडे राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपने NEET परीक्षेच्या उमेदवाराला प्रश्नपत्रिका देण्याचे आश्वासन देऊन ४० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी, तिघेही विद्यार्थ्याला आणि त्याच्या कुटुंबाला गुरुग्रामला घेऊन गेले आणि पैशाची मागणी केली, त्यावर विद्यार्थ्याच्या कुटुंबाने त्यांना कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यावर पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून NEET UG 2025 परीक्षेदरम्यान एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका विद्यार्थ्याने बनावट प्रवेशपत्र घेऊन परीक्षेला बसला होता. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान विद्यार्थ्याने सांगितले की, अक्षय केंद्राच्या ऑपरेटरने त्याला व्हॉट्सअॅपद्वारे प्रवेशपत्र पाठवले होते. विद्यार्थ्याने त्याच प्रवेशपत्राचे प्रिंटआउट काढले आणि परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. परीक्षा समन्वयकांना प्रवेशपत्रातील नाव, पत्ता आणि परीक्षा केंद्राच्या माहितीमध्ये चुका आढळल्या. यानंतर, पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले.
लिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की प्रवेशपत्र बनावट होते आणि ते कायदेशीर स्त्रोतांकडून जारी केलेले नव्हते. अक्षय केंद्राच्या संचालकाचीही चौकशी केली जात आहे.
याशिवाय, शनिवारी विशेष कार्य दलाने नोएडाच्या सेक्टर-३ मधून NEET UG परीक्षेत गैरप्रकार करून फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून फॉर्च्युनर कारसह अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.