दिल्लीतील रोहिणी येथील CRPF शाळेत स्फोट 

सीआरपीएफ स्कूल सेक्टर-14 रोहिणीजवळ मोठ्या आवाजात स्फोट झाला आहे. एसएचओ/पीव्ही आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले जेथे शाळेची भिंत खराब झाली होती आणि दुर्गंधी येत होती. शेजारील दुकानाच्या काचा आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले.

दिल्लीतील रोहिणी येथील CRPF शाळेत स्फोट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रविवारची सकाळ दिल्लीतील रोहिणी परिसर स्फोटाच्या आवाजाने हदरला.  रोहिणीतील प्रशांत विहार परिसरात  सीआरपीएफ शाळेच्या भिंतीवरून स्फोटाचा आवाज ऐकू आला. (An explosion was heard from CRPF school,  of ​​Rohini area from Delhi) प्रत्यक्ष दर्शिनी दिलेल्या महितींनुसार स्फोटानंतर धुराचे लोटही दिसत होते. 
रोहिणीचे डीसीपी अमित गोयल यांनी सांगितले की, 'स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि त्याचा स्रोत काय हे स्पष्ट झालेले नाही.' डीसीपी म्हणाले की केवळ तज्ञांची टीमच परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती देऊ शकेल. गुन्हे शाखेच्या विशेष कक्षाचे विशेष कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.'
घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून ,अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने पाठवण्यात आल्या. मात्र, आगीची किंवा भिंतीचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की,  "सीआरपीएफ स्कूल सेक्टर-14 रोहिणीजवळ मोठ्या आवाजात स्फोट झाला आहे. एसएचओ/पीव्ही आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले जेथे शाळेची भिंत खराब झाली होती आणि दुर्गंधी येत होती. शेजारील दुकानाच्या काचा आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले. यात कोणीही जखमी झालेले नाही. क्राईम टीम, एफएसएल टीम आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातस्थळाची नाकेबंदी करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आहे. स्पेशल सेलची टिम  जवळपासच्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहे.