UPSC कडून शैक्षणिक वर्ष २०२४ साठी सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

UPSC २०२४  परीक्षा कॅलेंडर या परीक्षांना बसण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाचे ठरते.

UPSC कडून शैक्षणिक वर्ष २०२४ साठी सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
UPSC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने शैक्षणिक वर्ष २०२४ साठी नागरी सेवा, भारतीय वन सेवा, NDA, CDS (I) आणि इतर भरती परीक्षांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केली आहे. उमेदवार UPSC च्या www.upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे कॅलेंडर तपासू शकतात. (Union Public Service Commission Calender)

 

UPSC कॅलेंडर २०२४ केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित परीक्षा आणि भरती चाचण्यांबद्दल माहिती उपलब्ध करून देते. UPSC २०२४  परीक्षा कॅलेंडर या परीक्षांना बसण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाचे ठरते. यामध्ये २०२४ मध्ये  होणार्‍या विविध परीक्षांसाठी अधिसूचना, अर्ज सादर करणे आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखा नमूद केलेल्या आहेत.

कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

UPSC कॅलेंडर 2024 : परीक्षेच्या तारखा 

* अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा- १८ फेब्रुवारी २०२४ 

* संयुक्त भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा- १८ फेब्रुवारी  २०२४ 

* CISF AC(EXE) LDCE- १० मार्च,  २०२४ 

* NDA आणि NA परीक्षा (I)- २१ एप्रिल  २०२४ 

* CDS परीक्षा (I)- २१ एप्रिल  २०२४ 

* नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा- २६ मे २०२४

* भारतीय वन सेवा (प्राथमिक) परीक्षा- २६ मे २०२४

* IES/ISS परीक्षा - २१ जून २०२४ (परीक्षेचा कालावधी तीन दिवसांचा आहे)

* संयुक्त भू-शास्त्रज्ञ (मुख्य) परीक्षा- २२ जून २०२४ (परीक्षेचा कालावधी २ दिवस आहे)

* अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २३ जून २०२४

* एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा- १४ जुलै २०२४

* केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (AC) परीक्षा- ४ ऑगस्ट २०२४

* एनडीए. आणि एन.ए. परीक्षा (II)- १ सप्टेंबर  २०२४ 

* C.D.S. परीक्षा (II)- १ सप्टेंबर २०२४

* नागरी सेवा (मुख्य) परीक्षा- २० सप्टेंबर २०२४

* भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा- २४ नोव्हेंबर २०२४

* S.O./Steno (GD-B/GD-I) LDC- ७ जुलै २०२४

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k