सर जे. जे. कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा

जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.

सर जे. जे. कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेल्या सर जे. जे. कला महाविद्यालयाला (Sir JJ School of Art) अखेर मागील काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा बहाल करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी विद्यापीठाचा दर्जा प्रदान केल्याचे पत्र गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे सुपूर्द केले.

 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालय यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व सदिच्छा भेटीचा कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्री आदी उपस्थित होते.

सध्या नववी, अकरावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; दोनदा देता येणार बोर्डाची परीक्षा

 

जे. जे. कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. तसेच केंद्रीय विद्यापीठ बनण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. कार्यक्रमात बोलताना प्रधान म्हणाले की, महाविद्यालयाने भारतीय ज्ञान, परंपरेचे वारसा संवर्धित करीत जागतिक कलेचे केंद्र व्हावे. त्यासाठी या महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

 

देशात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिली व दुसरीची क्रमिक पाठ्यपुस्तके तयार आहेत. तिसरी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या मुख पृष्ठावर भारतीय परंपरा, संस्कृती, खेळ, ज्ञान, परंपरेची माहिती देण्यासाठी चित्रे काढण्याची जबाबदारी या महाविद्यालयावर सोपविण्यात येईल. भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुणांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम या महाविद्यालयाने तयार करावा, असेही मंत्री प्रधान म्हणाले.

 

परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आला. अभिमत विद्यापीठामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांचा दर्जा आणखी उंचावणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. या महाविद्यालयाचा चेहरा- मोहरा बदलण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह तयार करण्यात येत आहे. त्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर ऐतिहासिक इमारतींच्या नूतनीकरणासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k