काव्य रसिकांना मेजवानी; बुधवारी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन

प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, इंद्रजित भालेराव, प्रकाश घोडके आदी कवी या काव्य संमेलनात सहभागी होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या काव्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

काव्य रसिकांना मेजवानी; बुधवारी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या(Savitribai Phule Pune University)अमृत ​​महोत्सवा निमित्ताने येत्या बुधवारी ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) येथे राष्ट्रीय मराठी काव्य संमेलनाचे (Rashtriya Marathi Kavya Sammelan)आयोजन करण्यात आले आहे.प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, इंद्रजित भालेराव, प्रकाश घोडके आदी कवी या काव्य संमेलनात सहभागी होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या काव्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर काव्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आहेत. 

या काव्य संमेलनात कवी अरुण म्हात्रे (मुंबई), इंद्रजित भालेराव (परभणी) कल्पना दुधाळ (उरुळी कांचन), प्रकाश घोडके (मिरजगाव), सरिता पवार (सिंधुदुर्ग), अंजली कुलकर्णी (पुणे), सचिन केतकर (बडोदा), डॉ. संतोष पवार (श्रीरामपूर), संजीवनी ताडेगावकर (जालना), भरत दौंडकर (शिक्रापूर), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), अविनाश भारती (बीड), हेमंत अय्या (गोवा), तुकाराम धांडे (अकोले), प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर) हे राष्ट्रीय पातळीवरील कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत.

 या काव्य संमेलनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, विद्यापीठ अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या काव्य संमेलनाचे संयोजन मराठी काव्य संमेलन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. धोंडीराम पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ.संदीप सांगळे यांनी केले आहे.