'या' कारणामुळे 3 लाख भारतीय विद्यार्थ्यांना सोडावी लागणार अमेरिका 

अमेरिकन सरकारने पर्यायी व्यावहारिक प्रशिक्षण (ओपीटी) कामाचे अधिकार रद्द करण्यासाठी विधेयक सादर केल्यामुळे जवळपास ३ लाख भारतीय विद्यार्थ्यांना (3 lakh Indian students) अमेरिका सोडावी लागणार आहे. ओपीटी त्यांना तीन वर्षांसाठी (Banned from living in the US) अमेरिकेत राहण्याची आणि पदवीनंतर नोकरी शोधण्याची परवानगी देते.

'या' कारणामुळे 3 लाख भारतीय विद्यार्थ्यांना सोडावी लागणार अमेरिका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अमेरिकन सरकारने पर्यायी व्यावहारिक प्रशिक्षण (ओपीटी) कामाचे अधिकार रद्द करण्यासाठी विधेयक सादर केल्यामुळे जवळपास ३ लाख भारतीय विद्यार्थ्यांना (3 lakh Indian students) अमेरिका सोडावी लागणार आहे. ओपीटी त्यांना तीन वर्षांसाठी (Banned from living in the US) अमेरिकेत राहण्याची आणि पदवीनंतर नोकरी शोधण्याची परवानगी देते. सादर झालेल्या विधेयकामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या (Science, Technology, Engineering and Mathematics courses) विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अमेरिका सोडवा लागेल.  

त्यामुळे व्हिसाधारक विद्यार्थी घाबरले आहेत. एच -१बी वर्क व्हिसा देणाऱ्या अमेरिकन आणि भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. ओपीटी कार्यक्रमावर मर्यादा घातल्याने अशा कंपन्यांवरही मोठी बंधने येणार आहेत. एक तृतीयांश विद्यार्थी पात्र ओपन डोअर्सच्या अहवालानुसार, चालू शैक्षणिक वर्षात अमेरिकेत ३ लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी होते. ज्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश ओपीटीसाठी पात्र आहेत. 

अमेरिका व्हिसावर शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना १२ महिन्यांपर्यंत काम करण्याची संधी देतो. या नोकऱ्या फक्त त्यांच्या अभ्यासाशी संबंधित असलेल्या क्षेत्रातच करता येतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी 3 आणि गणित (स्टेम) क्षेत्रात पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना २४ महिने अतिरिक्त मिळतात. अशा प्रकारे ते अमेरिकेत एकूण ३६ महिने किंवा तीन वर्षे काम करू शकतात. एच -१बी व्हिसासाठी अर्ज करताना हा तीन वर्षांच कामाचा अनुभव खुप उपयुक्त ठरतो.