अमेरिकेचे नागरिकत्व आता ठरणार स्वप्न; ट्रंप यांची नवीन घोषणा

या निर्णयानुसार  जर दोन्ही पालक अमेरिकेत H-1B आणि H-4  सारख्या गैर-स्थलांतरित स्थितीत असतील,  त्यांना अमेरिकेत  स्थलांतरित होण्याची परवानगी मिळणार नाही.  त्यानंतर, अमेरिकेत जन्मला आलेल्या आपत्याला  परराष्ट्र विभाग अमेरिकन पासपोर्ट जारी करणार नाही.

अमेरिकेचे नागरिकत्व आता ठरणार स्वप्न; ट्रंप यांची नवीन घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

H-1B व्हीजाचा विषय अजून ताजा असतानाच आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द केले आहे. (Birthright US citizenship revoked) याचाच अर्थ आता अमेरिकेत जन्माला आलेल्या परदेशी मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे ग्रीन कार्डचे स्वप्न पाहणार्‍या अनेक भारतीयांची निराशा होणार आहे.  
ट्रंप यांनी जाहीर केले आहे की, त्यांचे सरकार यापुढे देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या लोकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिक मानणार नाही. ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करून जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द केले आहे. अमेरिकेत गेल्या १५० वर्षांपासून देशात जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व दिले जात आहे. 
या निर्णयानुसार जर दोन्ही पालक अमेरिकेत H-1B आणि H-4 सारख्या गैर-स्थलांतरित स्थितीत असतील, त्यांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याची परवानगी मिळणार नाही. त्यानंतर, अमेरिकेत जन्माला आलेल्या आपत्याला परराष्ट्र विभाग अमेरिकन पासपोर्ट देणार नाही. या आदेशाला सध्या न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. जर न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाला सहमती दिली, तर अमेरिकेत जन्मलेल्या H-1B आणि H-4 बिगर-स्थलांतरितांच्या मुलांना भविष्यात अमेरिकन नागरिक म्हणून मान्यता दिली जाणार नाही. 
बहुतेक भारतीय नागरिक H-1B व्हिसा मार्गाने अमेरिकेत प्रवास करतात आणि या मार्गाने गेल्यास त्यांना ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागते. मात्र यांच्या मुलांचा जन्म जर अमेरिकेत झाला तर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व सहज मिळत होते. 
प्यू रिसर्चने २०२२ च्या अमेरिकन जनगणनेच्या विश्लेषणानुसार, अमेरिकेत सुमारे ४.८ दशलक्ष भारतीय-अमेरिकन राहतात. यापैकी ३४% म्हणजेच १६ लाख अमेरिकेत जन्मले आहेत. सध्या, ज्या मुलांना अमेरिकेत जन्म झाला नाही आणि ज्यांचे कुटुंब ग्रीन कार्डसाठी बराच काळ वाट पाहत आहेत, त्यांना अमेरिकेतील वास्तव्याला  २१ वर्ष होताच स्वतःहून अमेरिका सोडावी लागते अन्यथा विद्यार्थी व्हिसा किंवा तत्सम दूसरा व्हिसा घ्यावा लागतो.