बी.एड पदवी असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी नवीन नियम

ज्या शिक्षकांनी फक्त अर्ज केला होता किंवा निवड झाली होती परंतु ते काम करत नव्हते त्यांना हा लाभ दिला जाणार नाही. ज्या शिक्षकांनी बी.एड केले आहे आणि ११ ऑगस्ट २०२३ च्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अनिवार्य असेल.

बी.एड पदवी असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी नवीन नियम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बी.एड पदवी संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (National Council for Teacher Education)  NCTE अनेक  महत्वाचे बदल केले आहेत.  ११ ऑगस्ट २०२३ पूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बी.एड पदवीच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांना ( B.Ed Teachers appointed in primary schools) आता  अनिवार्य प्रशिक्षण म्हणून सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागणार आहे. (A six-month bridge course will be required) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, NCTE हा  सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स तयार केला आहे. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था द्वारे आयोजित केला जाईल.

एनसीटीईच्या सदस्य सचिव अभिलाषा झा मिश्रा यांनी या संदर्भात  अधिसूचना प्रसिद्ध  केली आहे.  यानुसार, ज्या शिक्षकांनी फक्त अर्ज केला होता किंवा निवड झाली होती परंतु ते काम करत नव्हते त्यांना हा लाभ दिला जाणार नाही. ज्या शिक्षकांनी बी.एड केले आहे आणि ११ ऑगस्ट २०२३ च्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अनिवार्य असेल. सर्वोच्च न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी या प्रकरणात आणखी एक आदेश जारी केला होता. या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील ३५,००० शिक्षकांवरही होईल ज्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते.

एनसीईआरटीने जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी एक ब्रिज कोर्स देखील तयार केला आहे. याबाबतची माहिती सीबीएसईने शाळांनाही पाठवली आहे. हा ब्रिज कोर्स इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीसाठी ब्रिज कोर्स ३० दिवसांचा असेल आणि इयत्ता आठवीसाठी तो ४५ दिवसांचा असेल.