12th Exam : आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध, मंडळाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.

12th Exam : आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध, मंडळाने दिल्या महत्त्वाच्या सूचना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी- मार्च २०२६ परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध (Hall tickets are available from today) करून देण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीटे डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट विद्यार्थ्यांना द्यावे, अशी स्पष्ट सूचना राज्य मंडळाकडून (Important instructions from the state board) देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - UPSC NDA आणि NA-I परीक्षेच्या तारखा जाहीर, या दिवशी परीक्षा होणार

बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.

फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असल्याशिवाय ते वैध मानले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. हॉल तिकीट नसल्यास परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून दिल्या आहेत. 

दरम्यान, १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा याच कालावधीत पार पडणार आहेत. यापूर्वी, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएससीक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहेत.