आरआरबीकडून 311 पदांसाठी भरती सुरू; रेल्वे मंत्रालयांतर्गत भरती
या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ अनुवादक, शिक्षक, कर्मचारी कल्याण निरीक्षक, प्रसिद्धी निरीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, मुख्य विधी सहाय्यक आणि वैज्ञानिक पर्यवेक्षक यांसारख्या पदांचा समावेश आहे. यासाठी एकूण 311 पदांची भरती करण्यात येत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय रेल्वेने (RRB) विविध मंत्रालयीन आणि अंतर्गत (Ministerial and Isolated) श्रेणींमधील विविध 311 पदांसाठी भरतीची (Recruitment for various 311 posts) अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी अर्ज प्रक्रिया 30 डिसेंबर 2025 पासून सुरू केली जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत 29 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आली आहे. उमेदवार rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील.
या भरती मोहिमेअंतर्गत कनिष्ठ अनुवादक, शिक्षक, कर्मचारी कल्याण निरीक्षक, प्रसिद्धी निरीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, मुख्य विधी सहाय्यक आणि वैज्ञानिक पर्यवेक्षक यांसारख्या पदांचा समावेश आहे. यासाठी एकूण 311 पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती विविध रेल्वे विभागांमध्ये मंत्रालयीन आणि विलग श्रेणींसाठी आहे, ज्यामध्ये विशेष कौशल्ये आवश्यक आहेत.
शैक्षणिक पात्रता -
कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी, ज्यामध्ये पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य विषय असावेत. कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक पदासाठी श्रम कायद्यांमध्ये विशेष प्राविण्य असलेली पदवी आणि डिप्लोमा किंवा LLB पदवी. मुख्य विधी सहाय्यक पदासाठी विधी पदवी आणि बारमध्ये वकील म्हणून किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक श्रेणी पदासाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषय घेऊन 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक पदासाठी जनसंपर्क, जाहिरात, पत्रकारिता किंवा जनसंवादामध्ये पदवी किंवा डिप्लोमा, तसेच 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क -
वयोमर्यादा किमान 18 वर्षे तर कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमयदित सवलत दिली जाईल. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क आकरण्यात आला आहे. तर एससी/एसटी प्रवर्गासाठी 250 रुपये असणार आहे.