अजब दावा! डार्विन आणि आइनस्टाईनच्या सिद्धांतामुळे दोन कोटी लोकांचा मृत्यू 

आपण शाळा-कॉलेजमध्ये जे काही वाचले होते, ते चुकीचे असल्याचे आता लक्षात असून त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्त्याने दावा केला आहे.

अजब दावा! डार्विन आणि आइनस्टाईनच्या सिद्धांतामुळे दोन कोटी लोकांचा मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

डार्विन (Charles Darwins Theory) आणि आइनस्टाईनचे वैज्ञानिक सिद्धांत (Einsteins Theory) चुकीचे असून त्यामुळे  दोन कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा राज कुमार या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात राज कुमार याने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याविषयी याचिका दाखल केली होती. सध्या या याचिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. 

 

आपण शाळा-कॉलेजमध्ये जे काही वाचले होते, ते चुकीचे असल्याचे आता लक्षात असून त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद सादर करताना याचिकाकर्त्याने दावा केला की, डार्विनचा सिद्धांत स्वीकारताना दोन कोटी लोक मरण पावले आहेत. आइन्स्टाईनचा विशेष सापेक्षतेच्या समीकरणाचा सिद्धांत (E = MC2) बरोबर नाही. मानवी उत्क्रांती बाबत डार्विनच्या वैज्ञानिक सिद्धांतांचेही त्यांनी खंडन केले. याचिकाकर्त्याने सांगितले की वैज्ञानिक सिद्धांतांचे खंडन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे युक्तिवाद आहेत. हे युक्तिवाद मांडण्यासाठी एक मंच हवा, अशी मागणी विद्यार्थ्याने न्यायालयाकडे केली आहे. 

‘इस्रो’ची नोकरी नको रे बाबा; उच्चशिक्षित तरुणांची पाठ, काय आहे नेमकं कारण?

 

सर्वोच्च न्यायालयाने डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताला आणि आइनस्टाईनच्या सापेक्षतेच्या समीकरणांना आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळून लावली. शुक्रवारी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर याचिकाकर्त्याला वैयक्तिकरित्या डार्विन आणि आइनस्टाइनचे वैज्ञानिक सिद्धांत चुकीचे वाटत असतील तर सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये वैज्ञानिक सिद्धांत योग्य की अयोग्य हा प्रश्न रिट याचिकेत उपस्थित केला जाऊ शकत नाही. या अंतर्गत मूलभूत अधिकारांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले जातात. जर तुम्हाला चूक लक्षात आली तर तुम्ही तुमचा सिद्धांत सुधारा, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले.