‘आकांक्षा नव्या युगाच्या’ हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

युवा पिढीने रोजगारक्षम होऊन शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्यरत व्हावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सच्या संचालक समीधा गांधी यांनी सांगितले आहे.

‘आकांक्षा नव्या युगाच्या’ हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन (Considering the changes in technology) रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास (Employability, Entrepreneurship and Sustainable Development) ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून डॉ.संजय गांधी (Dr. Sanjay Gandhi) यांनी लिहिलेले ‘आकांक्षा नव्या युगाच्या’ हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक (This book is a guide for the young generation) ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी व्यक्त केला आहे.

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित ‘आकांक्षा नव्या युगाच्या’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात  (Book Release Ceremony) ते बोलत होते.यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आय.आय.आय.टी. अलाहाबादचे संचालक प्रा. मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे अशुतोष रामगिर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका स्पष्ट केली. तर युवा पिढीने रोजगारक्षम होऊन शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्यरत व्हावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सच्या संचालक समीधा गांधी यांनी सांगितले आहे.   

आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक संभ्रमित युवा पिढीला, त्यांच्या स्पदंनांना साद घालणारे ठरेल, असे मत दादा इदाते यांनी व्यक्त केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीने साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. हे साहित्य भविष्याचे वेध घेणारे आहे,असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले. तर पुस्तकाचे शब्दांकनकर्ते प्रसाद मिरासदार यांनी पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली. युवा पिढीने या प्रेरणादायी पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मिरासदार यांनी केले आहे.