JEE Advanced 2023 : आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचाय? ही महत्वाची बातमी वाचा...

एकूण ३३ राष्ट्रीय संस्थांचा समावेश असून त्यामध्ये २३ आयआयटी, पाच आयसर, प्रत्येकी एक आयआयएससी, आयआयपीई, आयआयएसटी आणि आरजीआयपीटी या संस्थांचा समावेश आहे.

JEE Advanced 2023 : आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचाय? ही महत्वाची बातमी वाचा...
JEE Advanced 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील २३ आयआयटीसह (IIT) इतर राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमधील अभियांत्रिकी (Engineering Admission) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा येत्या ४ जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३० एप्रिल ते ७ मे या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यावर्षी ही परीक्षा आयआयटी गुवाहाटी या संस्थेकडून घेतली जाणार आहे. (JEE Advanced 2023 updates)

जेईई मुख्य परीक्षेनंतर जेईई ॲडव्हान्स्ड ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये एकूण ३३ राष्ट्रीय संस्थांचा समावेश असून त्यामध्ये २३ आयआयटी, पाच आयसर, प्रत्येकी एक आयआयएससी, आयआयपीई, आयआयएसटी आणि आरजीआयपीटी या संस्थांचा समावेश आहे. दरवर्षी चक्राकार पध्दतीने एका आयआयटीकडून ही परीक्षा घेतली जाते.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

ही परीक्षा चार जून रोजी होणार असून ३० एप्रिलपासून नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थी येत्या ८ मे पर्यंत परीक्षा अर्जाचे शुल्क भरू शकतात. पात्र विद्यार्थ्यांना २९ मे ते ४ जून या कालावधीत हॉल तिकीट (प्रवेशपत्र) डाउनलोड करून घेता येईल. ही परीक्षा संगणकावर आधारीत ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. जेईई मुख्य परीक्षा दिलेल्या टॉप अडीच लाख विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.

चार जून रोजी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक उत्तर सूची ११ जून रोजी उपलब्ध करून दिली जाईल. ११ ते १२ जून या कालावधीत या उत्तर सूचीवर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील १८ जून रोजी अंतिम उत्तर सूची आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल.

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचे वेळापत्रक –

नोंदणी – ३० एप्रिल ते ४ मे (सायं. ५ पर्यंत)

शुल्क भरण्याची मुदत – ५ मे (सायं. ५ पर्यंत)

प्रवेशपत्र मिळणार – २९ मे ते ४ जून (दुपारी २.३० पर्यंत)

ऑनलाईन परीक्षा – ४ जून (पेपर १ – ९ ते १२, पेपर २ – २.३० ते ५.३०)

तात्पुरती उत्तरसुची – ११ जून (स. १०)

उत्तरसुचीवर तक्रारी – ११ जून ते १२ जून (सायं. ५ पर्यंत)

अंतिम उत्तरसुची – १८ जून (स. १०)

अंतिम निकाल – १८ जून (स. १०)