शिक्षक-विद्यार्थिनीचे प्रेमसंबंध, घरच्यांचा विरोध हॉटेलमध्ये केला शेवट

शिक्षक आणि विद्यार्थीनीमध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रेम संबंध जुळले होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. तेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यावर काही निर्बंध लादले होते. तरीही ते दोघेही एकमेकांना चोरून भेटत होते. 

शिक्षक-विद्यार्थिनीचे प्रेमसंबंध, घरच्यांचा विरोध हॉटेलमध्ये केला शेवट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये (Uttar Pradesh Crime News) एका खासगी शाळेतील 24 वर्षीय शिक्षक आणि त्याच शाळेत  8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या  14 वर्षीय विद्यार्थीनीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या (Suicide of teacher and student) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिक्षक आणि विद्यार्थीनीमध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रेम संबंध (Love relationship between teacher and student) जुळले होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. तेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यावर काही निर्बंध लादले होते. तरीही ते दोघेही एकमेकांना चोरून भेटत होते. 

पोलिसांच्या तपासातून मृत व्यक्ती हा ज्वालाजीपुरम येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंधाची सुरूवात ही शाळेतच झाली होती. विद्यार्थीनीचे नाव किशोरी असून ती इयत्ता 8 मध्ये शिक्षण घेत होती. किशोरी त्याच शिक्षकाकडे शिकवणीसाठी त्यांच्या घरी जाऊ लागली होती. ज्यामुळे दोघांमधील गुरू शिष्याचे नाते एका वेगळ्या वळणावर गेले. यामुळे त्यांच्या नात्यात जवळीकता वाढली आणि या नातेसंबंधाची माहिती दोघांच्याही कुटुंबियांना झाली.

पोलिसांनी सायंकाळी 6 वाजता खेरेश्वर पोलीस ठाणे परिसरात ओयोओ हॉटेलचा रुम नंबर 204 मध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्या मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी संबंधित खोलीत एक विषाची बाटलीही पडली होती. या तापासातून समोर आले की, विद्यार्थीनी ही सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. शाळेत आल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थीनीला आपल्यासोबत घेतले आणि हॉटेलवर घेऊन गेला. दोघेही सकाळी 8.40 वाजताच्या सुमारास तो तरुण आणि मुलगी 204 क्रमांकाच्या खोलीत शिरले. जेव्हा दोघेही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खोलीतून बाहेर आले नाहीत तेव्हा हॉटेल मालकाला संशय आला.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर मास्टर कीने खोली उघडण्यात आली आणि खोलीत जे दिसले ते भयानक होते. तो तरुण भिंतीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि मुलीचा मृतदेह बेडवर पडला होता. दोघांचेही श्वास थांबले होते आणि सल्फाचे पाउच जवळच पडले होते. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.