कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी; कौशल्य विकासमंत्र्याची माहिती

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नावीण्यपूर्ण कौशल्य विकसित केले जात आहे.

कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी; कौशल्य विकासमंत्र्याची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (Maharashtra State Skills University) माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नावीण्यपूर्ण कौशल्य विकसित केले जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी (employment opportunities) अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. हे या विद्यापीठाचे यश आहे, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी व्यक्त केले. 

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षक दिनानिमित्त गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कौशल्या विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री, अमृत योजनेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून, सरकारी क्षेत्रात रोजगाराच्या मर्यादित संधी आहेत. विद्यापीठ आणि खासगी संस्थांमध्ये समन्वय उत्तमरीत्या साधला जात आहे, असे लोढा म्हणाले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ. जे. बी. जोशी यांनीही मत मांडले.