इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर  

ICG ने चार्जमन, MTS शिपाई आणि ड्राफ्ट्समन या पदांची भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार ICG indiancoastguard.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी तटरक्षक दलात Indian Coast Guard (ICG) नवीन संधी निर्माण झाली आहे. ICG ने चार्जमन / MTS शिपाई आणि ड्राफ्ट्समन या पदांची भरती जाहीर केली आहे. (Recruitment for the posts of Chargeman, MTS Peon and Draftsman announced) या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२४ आहे. पात्र उमेदवार ICGच्या indiancoastguard.gov.in अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

कोस्ट गार्ड नोकरी पात्रता
ICG चार्जमनच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/मरीन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ड्राफ्ट्समनकडे इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/मरीन इंजिनीअरिंग/नेव्हल आर्किटेक्चर/शिप कन्स्ट्रक्शन किंवा ड्राफ्ट्समनशिप सर्टिफिकेटमध्ये डिप्लोमा असावा. तर एमटीएस शिपाईसाठी (ICG शिपाई) 10वी किंवा त्यापूर्वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार फॉर्म भरू शकतात. या पदांसाठी अनुभवाशी संबंधित पात्रताही मागविण्यात आली आहे. 

चार्जमनच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर ड्राफ्ट्समनसाठी 18 ते 25 वर्षे व MTS शिपाईसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार म्हणजेच १५ डिसेंबर २०२४ च्या आधारावर वयाची गणना केली जाईल. या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ज्यामध्ये गणित, विज्ञान, सामान्य जागृती, इंग्रजी, तर्कशास्त्र इत्यादी विषयांमधून एकूण 80 प्रश्न विचारले जातील.