SSC CGL टियर-1 परीक्षेचा निकाल जाहीर
या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर - 2 परीक्षेसाठी पात्र असतील. SSC CGL टियर 2 ची परीक्षा 18, 19 आणि 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. गट 'बी' आणि गट 'क' श्रेणींमध्ये एकूण 17,727 पदे भरण्यासाठी SSC CGL भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) SSC CGL टियर-1 परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. (CGL Tier-1 exam results declared) अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर - 2 परीक्षेसाठी पात्र असतील. SC CGL टियर 2 ची परीक्षा 18, 19 आणि 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. गट 'बी' आणि गट 'क' श्रेणींमध्ये एकूण 17,727 पदे भरण्यासाठी SSC CGL भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
SSC CGL टियर-1 निकाल 2024 कसा डाउनलोड करायचा
* सर्व प्रथम SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
* यानंतर, नोटीस बोर्ड यादीच्या शीर्षस्थानी दिलेला SSC टियर 1 परीक्षेच्या निकालाची लिंक उघडा.
* SSC CGl PDF डाउनलोड करा आणि रोल नंबर वापरून तुमचा निकाल तपासा.
ही संपूर्ण परीक्षा 200 गुणांची होती आणि प्रत्येक विभागात 25 प्रश्न होते, प्रत्येक प्रश्नात 2 गुण होते. अशा प्रकारे, बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले गेले आणि चुकीच्या उत्तरासाठी 0.5 गुण वजा करण्यात आले आहेत. परीक्षेसाठी 60 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.