UGC NET साठी नोंदणीची मुदत वाढवली 

UGC NET परीक्षा 18 जून 2024 रोजी घेतली जाणार आहे. UGC-NET परीक्षा 83 विषयांसाठी OMR (पेन आणि पेपर) स्वरूपात घेतली जाईल.

UGC NET साठी नोंदणीची मुदत वाढवली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC नेट जून 2024 साठी नोंदणीची अंतिम मुदत  वाढवली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आता अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in द्वारे 15 मे 2024 पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यावेळी नेट परीक्षेद्वारे पीएच.डी.(Ph.D)साठी प्रवेश दिला जाणार आहे.

UGC NET परीक्षा 18 जून 2024 रोजी घेतली जाणार आहे. UGC-NET परीक्षा 83 विषयांसाठी OMR (पेन आणि पेपर) स्वरूपात घेतली जाईल.
UGC NET परीक्षेसाठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1150 रुपये, इतर मागासवर्गीय (OBC-NCL) उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील तर SC, ST किंवा ट्रान्सजेंडर उमेदवारांना 325 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

* नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

दहावीची गुणपत्रिका, बारावीची गुणपत्रिका, पात्रता पदवी प्रमाणपत्र,  पासपोर्ट साइज फोटो, वैध फोटो आयडी, श्रेणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र 

UGC NET 2024 : अर्ज कसा करावा?

* सर्व प्रथम उमेदवारांनी या ugcnet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* होम पेजवर उपलब्ध असलेल्या “UGC NET जून 2024 साठी अर्ज करा” वर क्लिक करा.
* UGC NET नोंदणी किंवा लॉगिनसाठी एक नवीन टॅब दिसेल.
* आता तुमची आवश्यक माहिती देऊन  नोंदणी फॉर्म भरा.
* नोंदणीनंतर UGC NET अर्ज फॉर्म 2024 भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 
* अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
* पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.