NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशीद, गोध्रा हत्याकांड आदी संदर्भ वगळाले 

NCERT द्वारे केलेले हे बदल या सत्रापासून म्हणजेच 2024-25 पासून लागू केले जाणार आहेत.

NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशीद, गोध्रा हत्याकांड आदी संदर्भ वगळाले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशाच्या राजकीय आणि समाजिक चित्र बदलण्यात महत्वाची बाब ठरलेले बाबरी मशीद(Babri Masjid), गोध्रा हत्याकांड, हिंदुत्वाचे राजकारण' आदी विषयातील काही संदर्भ बारावीच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च (NCERT) ने इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या (12th Political Science Subjects)आठव्या अध्यायात काही बदल केले आहेत. 

कौन्सिलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ncert.nic.in, 'भारतीय राजकारण: नवीन अध्याय' या शीर्षकाच्या 8 व्या अध्यायात सध्याच्या भारतीय राजकारणात नवीन संदर्भ जोडले गेले आहेत, तर 'बाबरी', 'गुजरात दंगल' आणि 'हिंदुत्वाचे राजकारण' या आधीच्या प्रकरणांमध्ये काही 'अल्पसंख्याकांचे मुद्दे' सारखे संदर्भ काढून टाकले आहेत.
NCERT ने याच प्रकरणातील ‘बाबरी मशीद’ आणि ‘हिंदुत्वाचे राजकारण’ या संदर्भातील संदर्भ काढून टाकले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या संवैधानिक खंडपीठाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्यात आल्याचे आशयात म्हटले आहे. तर दुसरीकडे, 'डेमोक्रेटिक राइट्स' या शीर्षकाच्या पाचव्या अध्यायात गुजरात दंगलीचा संदर्भ देण्यात आला होता, जो आता काढून टाकण्यात आला आहे. ही घटना २० वर्षे जुनी असून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे निकाली काढण्यात आल्याचे परिषदेने आपल्या बाजूने सांगितले.

NCERT द्वारे केलेले हे बदल या सत्रापासून म्हणजेच 2024-25 पासून लागू केले जाणार आहेत. NCERT ने निर्धारित केलेला अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) शी संलग्न देशभरातील 30 हजाराहून अधिक शाळांमध्ये लागू केला जातो. अशा स्थितीत यंदा या शाळांतील बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयातील नवीन बदलानुसार शिकवले जाणार आहे.