नागपूर शासकीय वैद्यकीय भरती परीक्षेचा निकाल जाहीर
परीक्षेत सहभागी झालेले उमेदवरांना अधिकृत संकेतस्थळ https://gmcnagpur.org जाऊन निकाल पाहू शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या (Department of Medical Education and Medicines) अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) विविध पदांच्या ६८० रिक्त जागांसाठी भरती (Nagpur District Medical/Dental/Ayurveda College Recruitment) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानुसार आता सरळ सेवेद्वारा घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर (Results announced) करण्यात आला आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवरांना अधिकृत संकेतस्थळ https://gmcnagpur.org जाऊन निकाल पाहू शकतात.
या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांची २६, २८ ऑगस्ट व ४ सप्टेंबर रोजी कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची कम्प्युटरद्वारे पडताळणी केली जाणार आहे. हा निकाल उमेदवारांनी अर्ज भरताना भरलेल्या माहितीच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये काही तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते.
असा पाहाता निकाल
सर्वप्रथम, GMC नागपूरची अधिकृत वेबसाइट https://gmcnagpur.org जा. मुख्य पृष्ठावर निवड प्रक्रिया किंवा निकाल याबद्दलची लिंक शोधा. निकालाच्या पानावर, GMC नागपूर ग्रुप D निकाल या लिंकवर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. निकाल स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यावर, त्याला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड किंवा ‘प्रिंट’ बटणावर क्लिक करा. तुम्हाला आवश्यक असल्यास, निकालाची प्रिंटआउट काढून घ्या.