UGC NET साठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली

NTA ने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्याची तारीख 19 मे पर्यंत वाढवली असल्याचे म्हटले आहे.

UGC NET साठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UGC NET साठी अर्ज करण्याची बुधवारी (दि.१५) शेवटची मुदत होती, पण आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने ही मुदत पुन्हा वाढवली आहे. NTA ने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्याची तारीख 19 मे पर्यंत वाढवली असल्याचे म्हटले आहे.जून मध्ये होणा-या नेट परीक्षेच्या (net exam) गुणांच्या आधारे पीएचडी साठी प्रवेश दिला जाणार आहे.

यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, UGC NET साठी शुल्क भरण्याची अंतिम तारीख 16 मे 2024 होती. आता NTA ने नोंदणीची अंतिम तारीख 19 मे पर्यंत वाढवल्याने उमेदवारांना 20 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत शुल्क भरता येणार आहे. तर अर्जातील दुरुस्तीची विंडो 21 ते 23 मे या कालावधीत उपलब्ध असेल. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते आता ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर 19 मे पर्यंत अर्ज करू शकतात. 

UGC NET 2024 ची परीक्षा 18 जून रोजी होणार आहे. ८३ विषयांसाठी OMR (पेन आणि पेपर) स्वरूपात परीक्षा घेतली जाईल. नोंदणी विंडो बंद केल्यानंतर, NTA उमेदवारांसाठी अर्ज दुरुस्ती विंडो उघडेल.

UGC NET 2024: अर्ज कसा करावा?

* सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट-(ugcnet.nta.nic.in.) वर जा.

* होम पेजवर उपलब्ध असलेल्या “UGC NET जून 2024 साठी अर्ज करा” वर क्लिक करा.

* UGC NET नोंदणी किंवा लॉगिनसाठी एक नवीन टॅब दिसेल.

* आता तुमची आवश्यक माहिती देऊन निव्वळ नोंदणी फॉर्म भरा.

* नोंदणीनंतर UGC NET अर्ज फॉर्म 2024 भरा.

* आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

* पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.