आता 'या' राज्यांमध्येही हिंदी भाषेतून असेल मेडीकलचा अभ्यास
राजस्थान सरकारने त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एज्युवार्ता न्युज नेटवर्क
नुकताच मध्य प्रदेश(Madhya Pradesh), बिहार(Bihar), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राज्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम (medical syllabus) हिंदीतून शिकवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगड (Chhattisgarh government) सरकारने 2024-25 च्या चालू शैक्षणिक सत्रापासून राज्यात MBBS चा अभ्यास हिंदी भाषेतून (Hindi language) सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.
राजस्थान सरकारने त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याअंतर्गत राज्यातील दोन वैद्यकीय महाविद्यालये यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून शिक्षणाची भाषा इंग्रजी माध्यमातून हिंदीमध्ये बदलणार आहेत. जोधपूरचे संपूर्णानंद मेडिकल कॉलेज आणि मारवाड मेडिकल युनिव्हर्सिटीशी संलग्न बारमेरचे मेडिकल कॉलेज अशी या कॉलेजांची नावे आहेत. ज्यात आता हे बदल केले जाणार आहेत
छत्तीसगडनेही 2024-25 च्या सत्रापासून नवीन बदल केले जातील अशी घोषणा केली आहे. बहुतांशी हिंदी माध्यमाच्या शाळांतून येणाऱ्या आणि भाषेच्या अडथळ्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले, 'हिंदीमध्ये अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत गोष्टी मजबूत होतील, त्यांना या विषयाची सखोल माहिती मिळेल आणि त्यांना चांगले डॉक्टर बनण्यास मदत होईल."
eduvarta@gmail.com