आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, मुख्याध्यापक निलंबित 

शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रकल्पधिकारी बी. आर. जाधव, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस. एल. पोकळा, के. एम. शिंदे व आर. बी. घोलप यांच्या नेमण्यात आलेल्या प्रकल्पस्तरीय चौकशी समितीने प्राथमिक अहवालात या शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि महिला अधिक्षिका जयश्री वाघाडे या दोघांवर ठपका ठेवला.

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, मुख्याध्यापक निलंबित 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ठाण्याच्या मुरबाड (Murbad girl commits suicide) तालुक्यातील मोरोशी या शासकीय अदिवासी आश्रम शाळेत (Government Tribal Ashram School Moroshi) धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने (Students studying in class 10th) वसतिगृहाच्या छताला असलेल्या हुकाला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या (Suicide by hanging) केली. या घटनेला शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृह महिला अधिक्षिका यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. पालक आणि नागरीकांचा वाढता रोष पाहता शिक्षण विभागाने दोघांचे तात्काळ निलंबन केले आहे.  

हेही वाचा - धक्कादायक ! कॉलेज म्हणते आम्हाला शासनाचे अनुदान नको; प्राध्यापकांचा विरोध

शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रकल्पधिकारी बी. आर. जाधव, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस. एल. पोकळा, के. एम. शिंदे व आर. बी. घोलप यांच्या नेमण्यात आलेल्या प्रकल्पस्तरीय चौकशी समितीने प्राथमिक अहवालात या शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि महिला अधिक्षिका जयश्री वाघाडे या दोघांवर ठपका ठेवला. या दोघांना निलंबित करण्याची शिफारस प्रभारी प्रकल्पधिकारी डी. डी. काळपांडे यांनी केल्यानंतर ठाण्याचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी मुख्याध्यापक भोई व महिला अधिक्षिका वाघाडे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक पहिले ते बारावी पर्यंत शासकीय आश्रम शाळा आहे. या शाळेत एकूण ४०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ७३ निवासी विद्यार्थिनींपैकी ६८ हजर होत्या. यातील एका दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची मिळाताच शिक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आे.