MPSC : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेऊ नका; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी 

महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट असताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेऊ नका, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोग आणि सरकारकडे केली आहे.  

MPSC : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेऊ नका; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) नुकतेच ग्रुप सी पदांच्या भरती (Recruitment for Group C posts) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. ग्रुप क पदांसाठीची पूर्व परीक्षा १ जून २०२५ (Preliminary examination for Group C posts 1 June 2025) रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट (Red alert for rain) असताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेऊ नका, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी आयोग आणि सरकारकडे केली आहे.  

महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट असताना MPSC ने त्यांच्या आज होणाऱ्या परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्य शासनाकडून मत न मागवता पूर्व नियोजित वेळापत्रक कायम ठेवल्याचे समजते. अशा आपत्तीच्या परिस्थितीत बाहेरगावावरून  येणाऱ्या परीक्षार्थींना नाईलाजाने बाहेर पडून जीव धोक्यात घालावा लागेल. त्यांना खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे १ जून रोजी होणार्‍या परीक्षेच्या वेळापत्रकात तरी बदल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.  
_____________________________________

राज्यात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. तरीदेखील  MPSC ने ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेचं वेळापत्रक कायम ठेवले आहे. अशा आपत्तीजनक स्थितीत, दूरवरून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. काही ठिकाणी रस्ते बंद आहेत, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत आहे, तर काही भागात सततच्या पावसामुळे परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. अशा वेळी परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे MPSC ने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा आणि येणाऱ्या काही दिवसात होणारे पेपर स्थगित करावेत तसेच भविष्यात अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्याआधी राज्य शासन, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान खात्याशी सल्लामसलत करूनच पुढे जावे. 

विश्वजीत कदम, आमदार