पदवीधारकांना नोकरीची संधी; विद्यापीठामार्फत 'मेगा जॉब फेअर'चे आयोजन 

विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेल्या या जॉब फेअरसाठी विद्यार्थ्यांना प्रथम https://shorturl.at/zDnLU या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. "हा मेगा जॉब फेअर केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे रोजगारामध्ये रूपांतर करण्याची संधी आहे.

पदवीधारकांना नोकरीची संधी; विद्यापीठामार्फत 'मेगा जॉब फेअर'चे आयोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरूणांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (ICA Edu Skills and Savitribai Phule Pune University) आणि ICA Edu Skills यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 3 जून रोजी Mega Job Fair चे आयोजन (Mega Job Fair to be held on June 3) करण्यात आले आहे.

शिक्षण आणि रोजगार यामधील दरी भरून काढण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ICA Edu Skills Pvt. Ltd. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या (Department of Commerce, Savitribai Phule Pune University) सहकार्याने Mega Job Fair 2025 चे आयोजन केले आहे. हा मेगा जॉब फेअर येत्या 3 जून रोजी सकाळी 10.00 वाजता पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात होणार आहे. 

विद्यापीठाकडून आयोजित करण्यात आलेल्या या जॉब फेअरसाठी विद्यार्थ्यांना प्रथम https://shorturl.at/zDnLU या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. "हा मेगा जॉब फेअर केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे रोजगारामध्ये रूपांतर करण्याची संधी आहे. पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाबरोबर भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे," असे ICA Edu Skills Pvt. Ltd. तर्फे सांगण्यात आले. ICA चे संपूर्ण भारतभर 100+ केंद्र आहेत आणि ती Accounts, Finance, Taxation इत्यादी क्षेत्रांत प्रशिक्षण देते, असे सांगण्यात आले आहे. 

हा जॉब फेअर विशेषतः B.Com, M.Com, आणि BBA पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केला आहे. ICA Edu Skills च्या उद्योगसन्मुख कौशल्य प्रशिक्षण आणि 100% प्लेसमेंट सहाय्याच्या ध्येयाचा हा एक भाग आहे. मागील वर्षीच्या जॉब फेअरमध्ये जवळपास 2 हजार 900 नोंदणी केली होती. तर दीड हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या जाॅब फेअरमध्ये 24 कंपन्या सहभागी झाल्या होत्या, तर 250+ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली होती.