फार्मसीची पहिली फेरी जाहीर, २९ हजार विद्यार्थ्यांना 'सीट अलॉटमेंट'
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेशासाठी ४४ हजार २८७ जागा उपलब्ध असून, या जागांसाठी राज्यभरातून ५५ हजार ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ३८ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जवळपास चार महिन्यांनंतर फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमाची (Pharmacy degree courses) पहिली प्रवेश फेरी अखेर जाहीर (First admission round announced) झाली आहे. या पहिल्या फेरीत २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट (Seat allotment to 29 thousand 166 students) करण्यात आले आहेत. यातील १३ हजार ८९५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांचे प्रवेश हे ऑटो फ्रिज (Auto fridge) झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून या प्रवेशाच्या वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.
ना परीक्षा, ना मुलाखत थेट भरती! DRDO मध्ये १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी..
औषधनिर्माणशास्त्र संस्थांना दरवर्षी पीसीआयकडून मान्यता घ्यावी लागते. या प्रक्रियेसाठी पीसीआयकडून दरवर्षी विलंब होत असल्याने त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेवर होतो. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेमुळे सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी चार महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबावे लागले. मान्यता प्रक्रिया संपल्यानंतर सीईटी कक्षाने औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेशासाठी ४४ हजार २८७ जागा उपलब्ध असून, या जागांसाठी राज्यभरातून ५५ हजार ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ३८ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यापैकी १३ हजार ८९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश 'स्वयं गोठविण्यात' आले आहेत.
प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकारून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर सायंकाळी ५ पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश घ्यायचा आहे. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहण्याऱ्या जागांचा तपशील ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान भरता येणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर होणार आहे.