MHT-CET PCM 2024 : वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारिख ?

उमेदवारांना काही वैयक्तिक कारणासाठी बदल आवश्यक वाटत असल्यास त्यांच्याकडून इमेल मागवण्यात आले आहेत.

MHT-CET PCM 2024 :  वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारिख ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे.  यंदा लोकसभा निवडणुकांमुळे विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आहे. येत्या ५ मे रोजी होणारी MHT-CET PCM गट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना काही वैयक्तिक कारणासाठी बदल आवश्यक वाटत असल्यास त्यांच्याकडून इमेल मागवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या अडचण लक्षात घेवून ही परीक्षात घेण्यात येणार आहे.  

येत्या ५ मे रोजी होणारी NEET-UG 2024 परीक्षा लक्षात घेऊन MHT-CET PCM गट ही परीक्षा ५ मे रोजी ठेवण्यात आली नाही. तरीही ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर MHT-CET PCM 2024 या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटत आहे. अशा सर्व उमेदवारांनी आपला विनंती अर्ज परीक्षेच्या प्रवेश पत्रासह mhtcetpcm2024@gmail.com या इमेलला पाठवावा. कृपया लक्षात ठेवा की या संदर्भातील विनंती 26 एप्रिलपर्यंतच स्विकारली जाईल, असे सीईटी सेलने आपल्या अधिकृत सुचना पत्रात नमुद केले आहे. 

येत्या ५ मे रोजी होणारी MHT-CET (PCM गट) परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सीईटी सेलने म्हटले आहे की, सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी की MHT-CET (PCM गट) परीक्षा 05-05-2024 रोजी घेतली जाणार नाही, कारण NEET – UG परीक्षा 05-05-2024 रोजी आहे. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. त्यामुळे ५ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे.