MBA CET : परीक्षेतील प्रश्न चुकल्यामुळे CET Cell चा मोठा निर्णय; 28 गुण देणार फुकट
राज्यभरातून जवळपास २५३ हरकती विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. यामध्ये १०१ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी हरकती मांडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी १३४ तक्रारी लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. त्यात अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१ तक्रारी, क्वांटीटेटिव्ह अॅप्टिट्यूडच्या ३५ तक्रारी, व्हर्बल अॅबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Examination) घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी (MBA CET) परीक्षेत अनेक चुका झाल्याचे दिसून आले होते. त्यावर आता सीईटी सेलने (CET Cell) मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत तीन बॅचमध्ये मिळून तब्बल २८ प्रश्न चुकीचे (Wrong question) आले होते. त्यामुळे या तिन्ही बॅचेसमधील सर्व विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे एक गुण (One marks per question) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय (This decision was made after complaints filed by students) घेण्यात आला आहे.
सीईटी सेलने १ एप्रिल ते ३ एप्रिलदरम्यान एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली होती. एकूण सहा सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यावर विद्यार्थ्यांना हरकती आणि तक्रारी नोंदविण्यासाठी २८ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान मुदत देण्यात आली होती. राज्यभरातून जवळपास २५३ हरकती विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. यामध्ये १०१ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी हरकती मांडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी १३४ तक्रारी लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. त्यात अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१ तक्रारी, क्वांटीटेटिव्ह अॅप्टिट्यूडच्या ३५ तक्रारी, व्हर्बल अॅबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या.
सहा प्रश्नांसाठी उत्तरपत्रिका केली अपडेट
विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत सीईटी सेलने शहानिशा केली. त्यानुसार असे निदर्शनास आले की, ३ बॅचेसमधील जवळपास २८ प्रश्नांमध्ये चुका आहेत. त्यानंतर सीईटी सेलने या चुकीच्या प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नामागे त्या बॅचेसमधील प्रत्येक विद्यार्थ्याला एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सहा प्रश्नांसाठी सीईटी सेलने उत्तरपत्रिका अपडेट केली आहे.
eduvarta@gmail.com