धक्कादायक : विद्यापीठातील वसतीगृहात सापडले अमली पदार्थ 

विद्यापीठातील मुलांच्या वसतीगृहात अमली पदार्थ सापडल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक : विद्यापीठातील वसतीगृहात सापडले अमली पदार्थ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)मुलांच्या वसतिगृहात (boys hostel)काही दिवसापूर्वी अमली पदार्थ आढळून आले. होते.त्यावर विद्यापीठ प्रशासनाने (university administration)गांभीर्याने दाखल घेऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित होतो.मात्र,प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप युवा सेनेचे राम थरकुडे (Yuva Sena Ram Tharkude)यांनी केला असून दोन दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेना (shivsena)स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

कल्याणी नगर आपघाताच्या घटनेनंतर शहरातील पब वर कारवाई झाली. तरूणाई व्यसनांच्या आहारी जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा विविध संघटनांनी पब संस्कृतीवर आवाज उठवला.हे प्रकरण ताजे असताना आता विद्यापीठातील मुलांच्या वसतीगृहात अमली पदार्थ सापडल्याची माहिती समोर आली आहे.विद्येच्या माहेरघरात अशा घटना घडणे लज्जास्पद आहे. तसेच विद्यापीठाच्या प्रतिमेस बाधा पोचवणारे आहे. अमली पदार्थ संपडल्याच्या घटनेला सुमारे दहा दिवस उलटून गेले तरी कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे विद्यापीठाची भूमिका संशयास्पद असल्याचे राम थरकुडे यांनी विद्यापीठाला दिलेल्या निवेदानात नमूद केले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना कळवून अमली पदार्थ पुरवणाऱ्या विकृतींवर कारवाई करण्यास पोलिसांना मदत करायाला हवी. तसेच या पुढे विद्यापीठ आवारात तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये अमली  पदार्थ येणार नाहीत यासाठी सतर्क रहावे. विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तसेच, विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचे वय व शिक्षण लक्षात घेता त्यांचे समुपदेशन करावे. तसेच, विद्यार्थी अमली पदार्थांकडे वळणार नाहीत याबाबत विद्यापीठाने जागरूकता मोहिम राबवावी.त्याचाप्रमाणे येत्या दोन दिवसात विद्यापीठाने यावर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख राम थरकुडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांना दिले आहे.