स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेचे उद्घाटन; 'या' तारखेपर्यंत विद्यार्थी करु शकतात अर्ज

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची आयडिया स्क्रीनिंग प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान यासाठीचे मार्गदर्शन होणार आहे.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धेचे उद्घाटन;  'या' तारखेपर्यंत विद्यार्थी करु शकतात अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या (SIH) सातव्या आवृत्तीचा आरंभ झाला आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थेतील (Institutions of Higher Education) इच्छुक विद्यार्थी (students) त्यासाठी येत्या 12 सप्टेंबरपर्यंत नोंदणी (Registration) करू शकतात. AICTE च्या दिल्ली येथील मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही स्पर्धा लॉन्च करण्यात आली आहे.उच्च शिक्षण विभागाचे (DHE) सचिव के संजय मूर्ती (K Sanjay Murthy) यांच्या हस्ते याचे हॅकाथॉनचे उद्घाटन झाले. 

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनची आयडिया स्क्रीनिंग प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान यासाठीचे मार्गदर्शन होणार आहे. AICTE चे चेअरमन प्रोफेसर टी. जी. सीताराम आणि व्हाईस चेअरमन अभय जेरे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे कौतुक करताना, AICTE चे अध्यक्ष, प्राध्यापक टी. जी. सीताराम यांनी विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग नवनिर्मितीला सक्षम करण्यासाठी करावा, असे सांगत विकसनशील भारत या व्हिजनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. 

मूर्ती यांनी शैक्षणिक सहकार्याला चालना देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) महत्त्वाच्या भूमिकेबद्दल माहिती देत स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या योगदानावर प्रकाश टाकला. शाश्वत भविष्य घडवण्यासाठी उपाय विकसित करण्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.