ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी पाच भारतीयांची रोड्स स्कॉलर म्हणून निवड

निवड झालेले हे विद्यार्थी ऑक्टोबर 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात जावून जगभरातील शंभराहून अधिक विद्वानांच्या समुहात सामील होण्यासाठी पूर्ण अनुदानीत पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी पाच भारतीयांची रोड्स स्कॉलर म्हणून निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

रोड्स स्कॉलर्स (Rhodes Scholar) इलेक्ट फॉर इंडिया 2025 ची (Elect for India 2025) निवड स्पर्धात्मक अर्ज प्रक्रिया आणि प्राथमिक मुलाखतींच्या दोन फेऱ्यांनंतर करण्यात आली आहे.  निवडलेल्या अंतिम स्पर्धकांची मुलाखत घेण्यात आली आणि त्यातून पाच भारतीय विद्यार्थ्यांची निवड (Selection of Indian students) करण्यात आली आहे.

या शिष्यवृत्तीसाठी (Rhodes Scholarship) जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असलेला रायन चक्रवर्ती, कायद्याच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी विभा स्वामीनाथन, सेंट स्टीफन कॉलेजमधून तत्त्वज्ञानात पदवी पूर्ण  केलेला रांची येथील दृष्टिहीन अवनीश वत्स, बरेली यूपी येथील पशुवैद्यकशास्त्रातील पहिला भारतीय अभ्यासक शुभम नरवाल आणि आयआयटी बॉम्बे येथे बीटेक अभियांत्रिकी भौतिकशास्त्राच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी पाल अग्रवाल या पाच जणांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेले हे विद्यार्थी ऑक्टोबर 2025 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात (Oxford University) जावून  जगभरातील शंभराहून अधिक विद्वानांच्या समुहात सामील होणार आहेत. तसेच त्यांना पूर्ण अनुदानीत पदव्युत्तर शिक्षण दिले जाणार आहेत.

दरम्यान, 2026 च्या रोड्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज जून 2025 मध्ये सुरु होणार आहेत. या शिष्यवृत्तीच्या अर्जाविषयी अधिक माहितीसाठी https://www.rhodeshouse.ox.ac.uk/scholarships/applying-for-the-scholarship/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.