UK च्या प्रतिष्ठित RCP महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची निवड

डॉ. पटेल यांचा जन्म इंग्लंडमधील लँकेशायर येथे भारतीय स्थलांतरित पालकांच्या घरात झाला. सध्या त्या  मँचेस्टरमध्ये सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट (किडनी स्पेशालिस्ट) म्हणून काम करत आहे. डॉ. पटेल म्हणाल्या की,  "मी या संस्थेला शक्य तितके सर्वोत्तम बनवण्यासाठी काम करेन जेणेकरून आम्ही आमच्या सदस्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू. तसेच  आमच्या रुग्णांनाही  सर्वोत्तम आरोग्य सेवा देऊ शकू." 

UK च्या प्रतिष्ठित RCP महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 
  १६ व्या शतकापासून चालत असलेल्या युनायटेड किंग्डमच्या (United Kingdom) प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन (Royal College of Physicians) RCP च्या नवीन अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची निवड झाली आहे. (Dr. Mumtaz Patel, of Indian origin, was elected as the president) पटेल  या पदावर निवडून येणाऱ्या १२३ व्या राष्ट्रपती आहेत तर  पहिल्या इंडो-आशियाई मुस्लिम महिला आहेत आणि पाचव्या महिला राष्ट्रपती आहेत.  
डॉ. पटेल यांचा जन्म इंग्लंडमधील लँकेशायर येथे भारतीय स्थलांतरित पालकांच्या घरात झाला. सध्या त्या  मँचेस्टरमध्ये सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट (किडनी स्पेशालिस्ट) म्हणून काम करत आहे.

डॉ. पटेल म्हणाल्या की,  "मी या संस्थेला शक्य तितके सर्वोत्तम बनवण्यासाठी काम करेन जेणेकरून आम्ही आमच्या सदस्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू. तसेच  आमच्या रुग्णांनाही  सर्वोत्तम आरोग्य सेवा देऊ शकू." 

डॉ. पटेल यांनी यापूर्वी आरसीपीमध्ये वरिष्ठ सेन्सॉर आणि शिक्षण आणि प्रशिक्षण उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. जून २०२४ पासून त्या कार्यवाहक अध्यक्ष म्हणूनही काम करत होत्या. आता, अध्यक्ष म्हणून, त्या आरसीपी कौन्सिलच्या अध्यक्षपदी राहतील आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्य बनतील.डॉ. मुमताज पटेल या एनएचएस इंग्लंडमध्ये पदव्युत्तर असोसिएट डीन म्हणूनही काम करतात.  त्यांनी यूके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य नेतृत्व अभ्यासक्रमांची रचना आणि आयोजन केले आहे.