SPPU : इंजिनिअरिंग २०१९ पॅटर्न विद्यार्थ्यांचे Re-Exam साठी आंदोलन; NSUI आक्रमक

विद्यार्थ्यांनी सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मात्र, प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनक गेटवर चढले आणि नंतर गेट तोडून विद्यापीठात प्रवेश केला.

SPPU : इंजिनिअरिंग २०१९ पॅटर्न विद्यार्थ्यांचे Re-Exam साठी आंदोलन; NSUI आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९ पॅटर्नच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना(Engineering students of 2019 pattern)एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे ‘ईअर डाऊन’चा (Year down) फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची स्थिती आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एन.एस.यू.आय, विद्यार्थी काँग्रेस तर्फे Re-Exam ची मागणी करण्यात आली.त्यासाठी शोकडोच्या संखेने विद्यार्थी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर चढून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. 

विद्यार्थ्यांनी सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मात्र, प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनक गेटवर चढले आणि नंतर गेट तोडून विद्यापीठात प्रवेश केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, आलसी इंजिनीयर चॅनेलचे रोनक खाबे सर, महेश कांबळे, राज जाधव, तेजस बनसोड, अभिषेक पवार, सचिन भाडख, वैभव महाडिक, अभिषेक जाधव, रोहित निकम, श्रद्धा डोंड, यश जाधव, साहिल चव्हाण, एनएसयुआय चे प्रवक्ते अविनाश सोळुंके आदी उपस्थित होते.