SPPUविद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचे निधन 

वक्तशीर,स्पष्ट वक्ते, तात्काळ निर्णय घेणारे अधिकारी, परीक्षा विभागाच्या कामकाजावर पकड ठेवणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. गोवा येथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले.

SPPUविद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचे निधन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कामावर आपली छाप उमटवणारे आणि प्रशासनावर पकड असणारे पुणे विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांचे आकस्मित निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे, असे काकडे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून महेश काकडे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. कोरोना काळातही विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा न सामना करता परीक्षा देता यावी, या दृष्टीने त्यांनी उपाययोजना केल्या. विद्यापीठाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचवले. तत्कालीन कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

वक्तशीर,स्पष्ट वक्ते, तात्काळ निर्णय घेणारे अधिकारी, परीक्षा विभागाच्या कामकाजावर पकड ठेवणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. गोवा येथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातून हळहाळ व्यक्त केली जात आहे.