चंद्रपूर जिल्ह्यात बी.एड. परीक्षेत संस्थाचालकाच्या मुलासह संपूर्ण वर्गाची मास कॉपी; सीसीटीव्ही फुटेज पाहून चौकशीची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथील गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयातील बी.एड. परीक्षा केंद्रावर गंभीर गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. खोली क्रमांक १४ मध्ये संस्थाचालकाचा मुलगा यश उन्मेश गेडाम याच्यासह वर्गातील इतर अनेक विद्यार्थी उघडपणे कॉपी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा.) येथील गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयातील बी.एड. परीक्षा केंद्रावर गंभीर गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. खोली क्रमांक १४ मध्ये संस्थाचालकाचा मुलगा यश उन्मेश गेडाम याच्यासह वर्गातील इतर अनेक विद्यार्थी उघडपणे कॉपी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. यामुळे केवळ यश गेडाम नव्हे तर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. गोंडवाना विद्यापीठात हे प्रकरण तापले असून सिनेट सदस्य प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना ई-मेल पाठवून चौकशी समिती स्थापन करण्याची आठवण करून दिली आहे. लवकर निर्णय न घेतल्यास कुलगुरू दालनासमोर धरणे आंदोलन करण्याची परवानगीही त्यांनी मागितली आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पोहोचल्या, उत्तरे आधीच तयार करून निवडक विद्यार्थ्यांना पुरविण्यात आली आणि पर्यवेक्षकांच्या नजरेसमोरच कॉपीचे प्रकार घडल्याचे गंभीर आरोप आहेत. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज असलेला पेनड्राइव्ह आणि इतर पुरावे विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. प्रशासनाने संबंधित परीक्षा केंद्र रद्द केल्याची माहिती दिली असली तरी केवळ केंद्र रद्द करणे पुरेसे नाही, असे सहा सिनेट सदस्यांचे मत आहे. प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, गैरप्रकारात कोणाकोणाचा सहभाग होता, परीक्षा केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांची जबाबदारी काय याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

यश गेडाम याला प्रश्नांची उत्तरे सोडवून देणारा शिक्षक अतुल कामडी आणि या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असलेला लिपीक मदन लेक्षपांडे यांचीही चौकशी आवश्यक आहे. तसेच त्यांच्या मोबाइलवर प्रश्नपत्रिका कोणी पाठविली याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी आणि त्यात सिनेट सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणी विद्यापीठाला करण्यात आली आहे. कुलगुरूंनी याबाबत एक दिवसाची मुदत मागितली होती.
विद्यापीठात प्रमुख अधिकाऱ्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मात्र सायंकाळपर्यंत कारवाईबाबत ठोस निर्णय झाल्याचे समोर आले नाही. विद्यार्थी आणि पालकांमध्ये या प्रकरणामुळे संताप आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी विद्यापीठाने तातडीने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags:
- Chandrapur B.Ed exam mass copying
- Chandrapur B.Ed exam scam
- Gondwana University mass copying
- B.Ed exam malpractice
- Talodhi B.Ed exam controversy
- Govind Prabhu College Chandrapur
- Chandrapur exam CCTV footage
- B.Ed examination investigation
- mass copying in Maharashtra
- Gondwana University investigation
- B.Ed exam cheating case
- Chandrapur education news
- Talodhi college mass copying
- CCTV footage examination scandal
- university exam malpractice
- B.Ed exam paper leak
- question paper leak case
- WhatsApp question paper leak
- examination centre cancellation
- university inquiry committee
- Chandrapur education scandal
- exam supervisor negligence
- college examination irregularities
- student mass copying case
- university senate members
- Gondwana University news
- B.Ed exam transparency
- Maharashtra university news
- exam cheating investigation
- Chandrapur latest news
- चंद्रपूर बीएड परीक्षा कॉपी
- चंद्रपूर मास कॉपी प्रकरण
- गोंडवाना विद्यापीठ
- बीएड परीक्षा गैरप्रकार
- तळोधी बीएड परीक्षा
- गोविंद प्रभू महाविद्यालय
- चंद्रपूर शिक्षण बातमी
- बीएड परीक्षेतील सामूहिक कॉपी
- सीसीटीव्ही फुटेज कॉपी प्रकरण
- बीएड परीक्षा चौकशी
- गोंडवाना विद्यापीठ चौकशी
- प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण
- व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका
- परीक्षा केंद्र रद्द
- परीक्षा केंद्रातील गैरव्यवहार
- संस्थाचालकाच्या मुलाची कॉपी
- यश गेडाम कॉपी प्रकरण
- अतुल कामडी चौकशी
- मदन लेक्षपांडे प्रकरण
- सिनेट सदस्यांची मागणी
- कुलगुरू प्रशांत बोकारे
- प्रा. दिलीप चौधरी
- बीएड परीक्षा पेपरफुटी
- महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार
- विद्यापीठ परीक्षा घोटाळा
- परीक्षा पर्यवेक्षकांची चौकशी
- चंद्रपूर ताज्या बातम्या
- तळोधी महाविद्यालय बातमी
- परीक्षा पारदर्शकता
- विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी Do you like this personality?
- चंद्रपूर बीएड परीक्षा कॉपी
- चंद्रपूर मास कॉपी प्रकरण
- गोंडवाना विद्यापीठ
- बीएड परीक्षा गैरप्रकार
- तळोधी बीएड परीक्षा
- गोविंद प्रभू महाविद्यालय
- चंद्रपूर शिक्षण बातमी
- बीएड परीक्षेतील सामूहिक कॉपी
- सीसीटीव्ही फुटेज कॉपी प्रकरण
- बीएड परीक्षा चौकशी
- गोंडवाना विद्यापीठ चौकशी
- प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण
- व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका
- परीक्षा केंद्र रद्द
- परीक्षा केंद्रातील गैरव्यवहार
- संस्थाचालकाच्या मुलाची कॉपी
- यश गेडाम कॉपी प्रकरण
- अतुल कामडी चौकशी
- मदन लेक्षपांडे प्रकरण
- सिनेट सदस्यांची मागणी
- कुलगुरू प्रशांत बोकारे
- प्रा. दिलीप चौधरी
- बीएड परीक्षा पेपरफुटी
- महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार
- विद्यापीठ परीक्षा घोटाळा
- परीक्षा पर्यवेक्षकांची चौकशी
- चंद्रपूर ताज्या बातम्या
- तळोधी महाविद्यालय बातमी
- परीक्षा पारदर्शकता
- विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी Do you like this personality?