नॅशनल इन्शुरन्स कंपनीत २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
सरकारी विमा क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने NICl एक महत्त्वाची संधी जाहीर केली आहे. कंपनीने संपूर्ण देशभरात एकूण २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरकारी विमा क्षेत्रात करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (NICL) एक महत्त्वाची संधी जाहीर केली आहे. कंपनीने संपूर्ण देशभरात एकूण २०० ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती केवळ १ वर्षाच्या प्रशिक्षणासाठी असून उमेदवारांना दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. विमा क्षेत्रात अनुभव मिळवून आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही मोहीम उपयुक्त ठरू शकते.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा १ एप्रिल २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सूट मिळेल. दिव्यांग उमेदवारांनाही सरकारी नियमांनुसार अतिरिक्त सवलत लागू राहील. या अटी पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतील.

निवड झालेल्या उमेदवारांना एकूण १२ महिन्यांचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत दरमहा १५,००० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळेल. यापैकी कंपनीचा वाटा ८ हजार ८५० रुपये तर केंद्र सरकारचा डीबीटीद्वारे ६ हजार १५० रुपये असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये कायमस्वरूपी किंवा थेट नोकरी देण्याचे कोणतेही बंधन NICL वर असणार नाही, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. ही संधी केवळ व्यावसायिक अनुभव आणि कौशल्य विकासासाठी आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष तपासून घ्यावेत. विमा क्षेत्रात पायाभरणी करण्यासाठी ही १ वर्षाची अप्रेंटिसशिप उपयुक्त ठरू शकते. पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
- NICL Recruitment 2026
- NICL Apprentice Recruitment 2026
- NICL Apprentice Vacancy 2026
- NICL Graduate Apprentice
- NICL Recruitment
- National Insurance Company Recruitment
- NICL 200 Vacancies
- NICL Apprentice Apply Online
- NICL Online Application 2026
- Graduate Apprentice Jobs 2026
- Government Apprenticeship Jobs
- Insurance Sector Jobs
- Graduate Jobs in India
- NICL Eligibility Criteria
- NICL Age Limit 2026
- NICL Stipend 15000
- NICL Apprentice Salary
- NICL Apprenticeship 2026
- One Year Apprenticeship
- NICL Training Programme
- NICL Recruitment Notification
- NICL Official Notification PDF
- NICL Application Process
- NICL SC ST Age Relaxation
- NICL OBC Age Relaxation
- Latest Government Jobs 2026
- Graduate Jobs for Freshers
- National Insurance Apprentice Vacancy
- Insurance Company Jobs 2026
- NICL Career Opportunities
- एनआयसीएल भरती २०२६
- एनआयसीएल अप्रेंटिस भरती
- एनआयसीएल अप्रेंटिस भरती २०२६
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरती
- एनआयसीएल २०० पदांची भरती
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती
- पदवीधरांसाठी सरकारी भरती
- सरकारी अप्रेंटिसशिप भरती
- विमा क्षेत्रातील नोकरी
- विमा कंपनी भरती २०२६
- एनआयसीएल ऑनलाइन अर्ज
- एनआयसीएल अर्ज प्रक्रिया
- एनआयसीएल पात्रता निकष
- एनआयसीएल वयोमर्यादा
- एनआयसीएल वयोमर्यादा सवलत
- एनआयसीएल स्टायपेंड
- एनआयसीएल विद्यावेतन १५०००
- अप्रेंटिसशिप प्रशिक्षण
- एक वर्षाचे प्रशिक्षण
- पदवीधरांसाठी नोकरी
- फ्रेशर्ससाठी सरकारी नोकरी
- केंद्र सरकारी अप्रेंटिस भरती
- बारावी नंतर नोकरी
- पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी नोकरी
- एससी एसटी वयोमर्यादा सवलत
- ओबीसी उमेदवारांसाठी भरती
- एनआयसीएल भरती जाहिरात
- एनआयसीएल अधिकृत अधिसूचना
- नवीन सरकारी नोकरी २०२६
- महाराष्ट्र सरकारी नोकरी अपडेट