ट्रेकिंगला गेलेले बिजनेस स्कुलचे विद्यार्थी रुग्णालयात दाखल ; डिहायड्रेशन मुळे बिघडली मुलांची तब्येत 

इंडस बिजनेस स्कुलचे  ट्रेकिंगला गेलेले १३ विद्यार्थी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, या घटनेमुळे कॉलेज परिसर आणि पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ट्रेकिंगला गेलेले बिजनेस स्कुलचे विद्यार्थी रुग्णालयात  दाखल ;    डिहायड्रेशन मुळे बिघडली मुलांची तब्येत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे : पुण्यातील वाकड येथील भूमकर चौक येथील इंडस बिजनेस स्कुलचे  ट्रेकिंगला गेलेले १३ विद्यार्थी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, या घटनेमुळे कॉलेज परिसर आणि पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : PRN BLOCK : सत्र पूर्तता संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी

प्राथमिक माहितीनुसार कॉलेजच्या ३०० विद्यार्थ्यांचा गट ट्रेकिंगसाठी गेले होते. यापैकी ४० विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांना चक्कर येऊ लागली. यापैकी १३ विद्यार्थ्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विद्यार्थी १८-२० या वयोगटातील असून काही विद्यार्थ्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप या संदर्भात पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.

" या प्रकरणी ज्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे, ते विद्यार्थी विविध रुग्णालयात दाखल आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. पण अद्याप कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कॉलेज विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही," अशी माहिती  हिंजवडीचे पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम पोळ यांनी दिली आहे.