बोर्डाकडून दहावी-बारावी जून-जुलै 2025 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत तर दहावीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतले जाणार आहे.

बोर्डाकडून दहावी-बारावी जून-जुलै 2025 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत तर दहावीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतले जाणार आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती,नाशिक, लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत जून-जुलै 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट देऊन वेळापत्रक पाहू शकतात.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी राज्य मंडळातर्फे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापील छापलेले किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असेही आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.