सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती

सहायक वसतिगृह अधीक्षक, सफाई कर्मचारी, माळी या पदांसाठी  इच्छुक व पात्र माजी सैनिक व इतर नागरीक यांनी येत्या २१ नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे शहरात पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षक, सफाई कर्मचारी, माळी या पदांसाठी  इच्छुक व पात्र माजी सैनिक व इतर नागरीक यांनी येत्या २१ नोव्हेंबर पर्यंत आपले अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह पर्वती पायथा, पुणे येथे सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

या तात्पुरत्या अशासकीय पदासाठी प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे.  सहायक वसतिगृह अधीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला २४ हजार ७९ रुपये, सफाई कर्मचारी व माळी पदावर निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येकी १२ हजार ४६५ रुपये मानधन देण्यात येणार आहे. 

हेही वाचा : शिक्षण SPPU News : विद्यार्थी संघटनांचा वाद पोलीस आयुक्तांच्या दरबारी; नियमावली तयार करणार?

अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांना ७०२०४१०९५४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (निवृत्त) यांनी केले आहे.