जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयात साकारणार 'आर्ट गॅलरी'
कुलाबा परिसरात जहांगीर, बजाज, पंडोल, आदी आर्ट गॅलरी आहेत. मात्र, त्यांचे अवाढव्य भाडे भाडे असल्याने कलाकारांना परवडत नाही, तसेच, त्यांचे बुकिंग पाच-सहा वर्षे आधीच झालेले असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांना नाममात्र भाडे आकारून शासनाची आर्ट गॅलरी उपलब्ध करण्यात येणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुलाबा हे आर्ट गॅलरीचे प्रमुख केंद्र (Art gallery center) आहे. परंतु, येथील आर्ट गॅलरींमध्ये कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी गेली काही वर्षे वाट पाहावी लागल आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय परिसरात आर्ट गॅलरी साकारण्यासाठी प्रयत्न करणार (Art gallery to be established) आहे, अशी ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली.
कुलाबा परिसरात जहांगीर, बजाज, पंडोल, आदी आर्ट गॅलरी आहेत. मात्र, त्यांचे अवाढव्य भाडे भाडे असल्याने कलाकारांना परवडत नाही, तसेच, त्यांचे बुकिंग पाच-सहा वर्षे आधीच झालेले असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांना नाममात्र भाडे आकारून शासनाची आर्ट गॅलरी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.
जीटी आणि कामा या दोन रुग्णालयांचे संलग्नीकरण करून २०२४ मध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र, महाविद्यालयासाठी जागा कमी पडत असल्यामुळे जीटी रुग्णालय परिसरातील १२ मजली इमारत पुढील तीन महिन्यांत रिकामी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही जागा महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी उपयोगात आणली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात जागा मिळेल, असेही नार्वेकर यांनी सांगितले.
नव्या मेडिकल कॉलेजात पीजी सुरू होणार
नव्या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा आहेत. पुढच्या वर्षी त्या १०० करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच वैद्यकीयचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असेही नार्वेकर म्हणाले.