MPSC मार्फत ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025' या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या परीक्षेत विविध विभागाअंतर्गत एकूण 385 रिक्त पदे भरली जातील. ज्यामध्ये राज्य सेवेसाठी 127, महाराष्ट्र वन सेवेसाठी 144 आणि बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांसाठी ११४ पदे समाविष्ट आहेत.  

MPSC मार्फत ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेच्या (Civil Services Gazetted Preliminary Examination) भरतीची मोठी जाहिरात प्रसिद्ध (Recruitment advertisement published) केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जोमाने अभ्यासाला लागावे लागणार आहे. या भरती मोहिमेअंतर्गत तब्बल ३८५ जागा भरल्या जाणार असून त्यासाठी २८ मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू (Application process starts from March 28th) करण्यात येणार आहे. 

'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025' या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या परीक्षेत विविध विभागाअंतर्गत एकूण 385 रिक्त पदे भरली जातील. ज्यामध्ये राज्य सेवेसाठी 127, महाराष्ट्र वन सेवेसाठी 144 आणि बांधकाम विभागात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांसाठी ११४ पदे समाविष्ट आहेत.  

ही परीक्षा रविवार, 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची ठिकाणी घेतली जाईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2025 असेल. उमेदवार 21 एप्रिल 2025 पर्यंत बँक चलनद्वारे शुल्क भरू शकतात.

सामान्य प्रशासन विभागाकडून 127 रिक्त जागा भरण्याची विनंती करण्यात आली होती, तरी देखील एमपीएससीने जाहिरात प्रकाशित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरत होती. त्यानंतर आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.