गृह मंत्रालयाकडून CISF च्या विस्ताराला मान्यता ; 2000 नवीन रोजगाराच्या संधी

आता दोन नवीन बटालियन तयार केल्या जातील. दोन्ही बटालियन एकत्रित करून एकूण २०५० पदे निर्माण केली जातील.

गृह मंत्रालयाकडून CISF च्या विस्ताराला मान्यता ; 2000 नवीन रोजगाराच्या संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गृह मंत्रालयाने (ministry of home affairs)  दोन नवीन बटालियनच्या निर्मितीला हिरवा कंदील दिला आहे. मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) विस्ताराला मान्यता दिली आहे. (Expansion of Central Industrial Security Force has been approved) या निर्णयामुळे अलीकडेच मंजूर झालेल्या महिला बटालियनसह या दलाची क्षमता वाढेल. तसेच २००० हून अधिक लोकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.या निर्णयानंतर सीआयएसएफची संख्या आता २ लाखांपर्यंत पोहोचेल. 
या विषयी अधिक माहिती देताना सीआयएसएफचे महानिरीक्षक अजय दहिया म्हणाले, " आता दोन नवीन बटालियन तयार केल्या जातील. दोन्ही बटालियन एकत्रित करून एकूण २०५० पदे निर्माण केली जातील. दोन्ही बटालियनसाठी १०२५ च्या समान पदे निश्चित करण्यात आली आहेत. नवीन पथकामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या रजा आणि आठवड्याच्या आरामाच्या संधी मिळतील.सीआयएसएफवरील वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे नवीन बटालियनला मान्यता देण्यात आली आहे. "
दरम्यान, काही दिवसांपूर्वी CISF मध्ये दोन नवीन बटालियन व्यतिरिक्त एका महिला बटालियनलाही मान्यता देण्यात आली होती. सध्या सीआयएसएफमध्ये महिलांचे प्रमाण ७ टक्के आहे.