ट्रम्प सरकारची मुजोरी कायम ; 1000 हून अधिक विद्यार्थ्यांचा स्टडी व्हीजा रद्द  

काही विद्यार्थ्यांचा असा दावा आहे की प्रशासनाने कोणतेही स्पष्ट कारण न देता  त्यांचा व्हीजा रद्द केला आहे.  हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, मेरीलँड विद्यापीठ आणि ओहायो स्टेट विद्यापीठ यासारख्या प्रमुख संस्थांमध्येही परदेशी विद्यार्थ्यांचा व्हीजा रद्द करण्यात आला आहे.  २०१८ मध्ये कोलंबिया विद्यापीठाचा  विद्यार्थी महमूद खलील याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रम्प सरकारची मुजोरी कायम ; 1000 हून अधिक विद्यार्थ्यांचा स्टडी व्हीजा रद्द  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या १,००० हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा म्हणजेच मेरिकेचा  कायदेशीर दर्जा रद्द केला आहे. (Trump administration has revoked the visas of more than 1,000 foreign students) यामुळे आता तिथल्या परदेशी  विद्यार्थ्यांसाठी हद्दपारीचा धोका वाढला आहे. 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन धोरणांतर्गत, ट्रम्प प्रशासनाने गेल्या काही आठवड्यात १,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. ट्रम्पच्या निर्णयामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी अटक आणि हद्दपारीचा धोका वाढला आहे. अहवालांनुसार, १६० महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील किमान १,०२४ विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेत आधीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी होमलँड सिक्युरिटी विभागाविरुद्ध खटले दाखल केले आहेत. 
काही विद्यार्थ्यांचा असा दावा आहे की प्रशासनाने कोणतेही स्पष्ट कारण न देता  त्यांचा व्हीजा रद्द केला आहे.  हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, मेरीलँड विद्यापीठ आणि ओहायो स्टेट विद्यापीठ यासारख्या प्रमुख संस्थांमध्येही परदेशी विद्यार्थ्यांचा व्हीजा रद्द करण्यात आला आहे. 
२०१८ मध्ये कोलंबिया विद्यापीठाचा  विद्यार्थी महमूद खलील याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते की 'यहूदीविरोधी' निदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा अधिकार आहे. तर दुसरीकडे काही विद्यापीठांचे म्हणणे आहे की स्थलांतरित विद्यार्थ्यांना किरकोळ उल्लंघनांसाठी देखील लक्ष्य केले जाते.