UGC NET जून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 

यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

UGC NET जून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे युजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द (NET exam time table is out) करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या (Post of Assistant Professor) पात्रतेसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी येत्या 18 जून रोजी  UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. नेट परीक्षा दोन सत्रात (NET Exam in two sessions)घेतली जाणार असून सकाळी 9.30 ते 12.30 या पहिल्या सत्रात तर दुपारी 3 ते 6 वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

NTA च्या परिपत्रकानुसार येत्या 18 जून 2024 रोजी पेन आणि पेपर पद्धतीने नेट परीक्षा घेतली जाईल. परीक्षेच्या तारखेसह, एनटीएने परीक्षा शहर सूचना स्लिप प्रसिध्द करण्याबाबतची माहिती देखील जाहीर केली आहे. त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजेच 8 जून रोजी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा सिटी स्लिपद्वारे, उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळवू शकतात. त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची तयारी करू शकतात.
UGC NET परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्यावी लागेल.

विद्यार्थ्यांना वेबसाइटच्या होम पेजवर Exam City Slip च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.आता विद्यार्थ्यांना लॉगिन तपशील (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) टाकावे लागतील. यानंतर, परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थी ही सिटी स्लिप डाउनलोड करू शकतात.