मुलींच्या वसतिगृहाचे छप्पर कोसळले, वीज ,जेवण, पाणीही बंद,सुरक्षा वाऱ्यावर

मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात दिवे नाही, पाणी नाही, खाणावळ बंद, त्यातच एका मजल्यावर कोसळलेला छपराचा भाग, त्यात पूर्णवेळ वॉर्डनही नाही, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली असल्याचा आरोप युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी केला आहे. 

मुलींच्या वसतिगृहाचे छप्पर कोसळले, वीज ,जेवण, पाणीही बंद,सुरक्षा वाऱ्यावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठ (Mumbai University) रोज काही ना काही कारणाने चर्चेत असते. आता कारण ठरले आहे मुलींची सुरक्षितता. नरिमन पॉईंट येथील मादाम कामा मुलींचे वसतिगृहात (Madam Cama Girls Hostel) सुविधांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. दिवे नाही, पाणी नाही, खाणावळ बंद, (No lights, no water, no food stalls) त्यातच एका मजल्यावर कोसळलेला छपराचा भाग, त्यात पूर्णवेळ वॉर्डनही नाही, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली असल्याचा आरोप युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी (Senate Member) केला आहे. 

वसतिगृहात १२६ विद्यार्थिनींचे वास्तव्य आहे. या  खाणावळ गेल्या १५ दिवसांपासून बंद असून विद्यार्थिनींना बाहेरून नाश्ता आणि जेवण मागवावे लागत आहे. येथे अनेक मजल्यांवरील दिवे बंद आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधाही उपलब्ध नाही, अशा तक्रारी युवा सेनेकडे आल्या होत्या. त्यानुसार युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी शुक्रवारी वसतिगृहाची पाहणी केली. आता युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे. 
_______________________________

वसतिगृहात सातपैकी केवळ तीन मजल्यांवर वॉटरकुलर आहेत, तर प्रत्येक मजल्यावर बाथरूममध्ये अंघोळीकरिता फक्त दोन गिझर आहेत. वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील छप्पर कोसळले आहे. 

प्रदीप सावंत, विद्यापीठ सिनेट सदस्य
_______________________________

विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसबाहेर हे वसतिगृह आहे. मात्र, असे असतानाही वसतिगृहात पूर्णवेळ वॉर्डन नाही, वॉर्डन केवळ दोन तास येऊन जातात. मंत्रालयाजवळ असलेल्या या वसतिगृहाची ही अवस्था असेल, तर राज्यातील अन्य वसतिगृहात काय परिस्थिती असेल? त्यातून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाने तत्काळ पूर्णवेळ वॉर्डन नियुक्त करावा.

अॅड. शीतल शेठ देवरुखकर, व्यवस्थापन परिषद सदस्या