दीक्षांत समारंभातील झगमगाट बंद ;  हातमागावरील भारतीय पोषाख परिधान करण्याचे युजीसीचे आदेश 

दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी  हातमागापासून (Handloom) तयार केलेले भारतीय कपडेच परिधान करावेत, असे निर्देश युजीसीने दिले आहेत.

दीक्षांत समारंभातील झगमगाट बंद ;  हातमागावरील भारतीय पोषाख परिधान करण्याचे युजीसीचे आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्थांमधील ग्रॅज्युएशन डे (Graduation Day) किंवा दीक्षांत समारंभ म्हटला कि सिंथेटिकचे चमकदार  ग्रॅज्युएशन गाऊन आणि त्या त्या संस्थेचा ठरलेला ड्रेसकोड. पण हे चित्र आता कालबाह्य होणार आहे. कारण आता विद्यापीठ अनुदान अयोग्य (UGC) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट पद्धतीचा ड्रेसकोड (dress code) ठरवण्यात आला आहे. दीक्षांत समारंभात आता विद्यार्थ्यांनी  हातमागापासून (Handloom) तयार केलेले भारतीय कपडेच परिधान करावेत, असे निर्देश UGC ने दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी यासंदर्भात सर्व विद्यापीठे आणि राज्यांच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. " सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना विनंती आहे की दीक्षांत समारंभाच्या ड्रेस कोडमध्ये भारतीय हातमाग किंवा हातमागाचा पोशाख समाविष्ट करावा. हातमागाचे कपडे प्रत्येक हंगामात आरामदायक असतात,असे कपडे  परिधान केल्याने विद्यार्थ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटेल. याशिवाय ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठात 'महाराष्ट्राचा बौद्ध वारसा' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

आपल्या राज्यांच्या पोशाखांना प्रोत्साहन देण्याच्या आणि दीक्षांत समारंभात त्यांचा समावेश करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. दरम्यान , आयआयटी, एनआयटीसह अनेक विद्यापीठांनी त्यांच्या राज्यातील पारंपरिक पोशाख परिधान करून पदवी प्रदान करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. याआधी २०१७-२०१८ मध्ये, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शैक्षणिक संस्थांना पारंपारिक काळा कोट ऐवजी भारतीय पोशाख परिधान करण्याचे निर्देश दिले होते. या मध्ये पुरुष कुर्ता-पायजमा किंवा धोतर घालू शकतात आणि महिला सूट-सलवार किंवा साडी घालू शकतात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.